देशभरातील लाखो पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी सध्या चर्चेत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची (CBT) नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पेन्शन दुप्पट करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली असल्याची जोरदार चर्चा होती, ज्यामुळे पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
परंतु, या बातम्यांमध्ये एक मोठा ‘ट्विस्ट’ आहे, जो प्रत्येक पेन्शनधारकाने आणि कर्मचाऱ्याने समजून घेणे आवश्यक आहे.
सध्याची स्थिती: किमान पेन्शन फक्त ₹१,०००
सध्या Employees’ Pension Scheme (EPS 1995) अंतर्गत EPFO सदस्यांना दरमहा किमान ₹१,००० पेन्शन मिळते. वाढत्या महागाईच्या काळात ही रक्कम अत्यंत अपुरी असल्यामुळे पेन्शनधारक आणि कर्मचारी संघटना अनेक वर्षांपासून यात वाढ करण्याची मागणी करत आहेत. किमान पेन्शनची रक्कम वाढवून ती ₹७,५०० पर्यंत करण्याची मागणी जोर धरत आहे, तर काही अहवालांमध्ये ती किमान ₹२,५०० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती आहे.
EPFO बैठकीतील निर्णय: मोठी घोषणा, पण पेन्शन वाढीवर नाही!
EPFO Pension केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच CBT ची २३८ वी बैठक संपन्न झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले, जे खालीलप्रमाणे आहेत:
- अंशतः पैसे काढण्याची सुविधा अधिक सुलभ: EPF मधून अंशतः पैसे काढण्याचे (Partial Withdrawal) नियम अत्यंत सोपे करण्यात आले आहेत. १३ क्लिष्ट तरतुदी एकत्र करून आता ‘आवश्यक गरजा’, ‘गृहनिर्माण गरजा’ आणि ‘विशेष परिस्थिती’ या तीन श्रेणींमध्ये नियमांचे सुलभीकरण करण्यात आले आहे. सदस्यांसाठी किमान सेवेची अट १२ महिने करण्यात आली आहे.
- ‘विश्वास योजना’ (Vishwas Yojana): प्रलंबित खटले आणि विवाद कमी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.
- EPFO 3.0 चे आधुनिकीकरण: EPFO च्या डिजिटल प्लॅटफॉर्मला आधुनिक रूप देण्यासाठी ‘EPFO 3.0’ च्या अंमलबजावणीला मंजुरी मिळाली.
- डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) घरपोच सेवा: ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक’ (IPPB) सोबत सामंजस्य करार करून पेन्शनधारकांना घरपोच डिजिटल जीवन प्रमाणपत्र सेवा देण्यासाठी मान्यता देण्यात आली.
- ट्विस्ट: PF आणि पेन्शन पूर्ण काढण्याची मुदत वाढली: नोकरी सोडल्यावर EPF पूर्ण काढण्यासाठी (Final Settlement) लागणारा कालावधी २ महिन्यांवरून १२ महिने करण्यात आला आहे. तसेच, EPS पेन्शन पूर्ण काढण्यासाठी (Final Pension Withdrawal) लागणारा कालावधी २ महिन्यांवरून थेट ३६ महिने करण्यात आला आहे. यामुळे अचानक नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तात्काळ निधी मिळणे कठीण होणार आहे.
पेन्शन दुप्पट होणार? नेमका निर्णय काय?
EPFO Pension सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांनी CBT च्या बैठकीत सांगितले की, किमान पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या सक्रिय विचाराधीन आहे. म्हणजेच, पेन्शन वाढवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा निर्णय बैठकीत झालेला नाही. फक्त, याबाबत विचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे, पेन्शन दुप्पट होण्याची किंवा वाढवण्याची घोषणा झाली आहे, हा दावा करणे सध्या तरी चुकीचे आहे.
दिवाळीपूर्वी दिलासा मिळणार?
पेन्शन वाढीचा विषय मंत्रिमंडळाच्या विचाराधीन असल्याने, जर सरकारने लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन अधिकृत अधिसूचना जारी केली, तर देशातील लाखो पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळू शकत.