बांधकाम कामगारांसाठी अत्यावश्यक वस्तू संच! मिळणार या वस्तु. Essential Kit

Essential Kit महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच (Essential Kit) देण्याची नवीन योजना सुरू झाली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, कामगार घरबसल्या आपल्या मोबाईलवरून यासाठी नोंदणी करू शकतात.

योजनेअंतर्गत मिळणाऱ्या १० अत्यावश्यक वस्तू: Essential Kit

या योजनेमध्ये एकूण १० वस्तूंचा समावेश आहे, ज्या दैनंदिन वापरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या वस्तूंची यादी खालीलप्रमाणे:

हे पण वाचा:
loan scheme information अण्णासाहेब पाटील महामंडळ वेबसाईट बंद… loan scheme information

१. पत्र्याची पेटी (Galvanized Trunk): साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी.
२. प्लास्टिकची चटई (Plastic Mat): बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी.
३. धान्य साठवण कोटी (Grain Storage Tank): २५ किलो क्षमतेची.
४. धान्य साठवण कोटी (Grain Storage Tank): २२ किलो क्षमतेची.
५. बेडशीट (Bedsheet): चांगल्या प्रतीची.
६. चादर (Chaddar): पांघरण्यासाठी.
७. ब्लँकेट (Blanket): थंडीपासून संरक्षणासाठी.
८. साखर ठेवण्याचा डबा (Sugar Container): १ किलो क्षमतेचा (SS 202).
९. चहा पावडर ठेवण्याचा डबा (Tea Container): ५०० ग्रॅम क्षमतेचा (SS 202).
१०. वॉटर प्युरिफायर (Water Purifier): १८ लिटर क्षमतेचा, २ कॅन्डलसह (SS 202).

ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया:

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागेल:

१. नोंदणी क्रमांक मिळवा:

  • सर्वप्रथम, गुगलवर “mahbocw profile login” असे सर्च करा.
  • तुमचा आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून तुमच्या प्रोफाइलमध्ये लॉग इन करा.
  • प्रोफाइलमध्ये तुम्हाला तुमचा “Registration Number” (नोंदणी क्रमांक) दिसेल. हा क्रमांक कॉपी करून ठेवा.

२. अत्यावश्यक वस्तू संचासाठी अर्ज करा:

  • त्यानंतर, अत्यावश्यक वस्तू संच वितरणाच्या अधिकृत वेबसाइटला (essentialkit.in) भेट द्या.
  • वेबसाईटवर तुमचा BOCW कामगार नोंदणी क्रमांक टाका आणि ‘Send OTP’ वर क्लिक करा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकून ‘Verify OTP’ वर क्लिक करा.

३. अपॉइंटमेंट निश्चित करा:

  • तुमची वैयक्तिक माहिती स्क्रीनवर दिसेल. माहिती तपासून खाली स्क्रोल करा.
  • ‘Select Camp/शिबिर निवडा’ या पर्यायावर क्लिक करून तुमच्या जवळचे शिबिर निवडा.
  • त्यानंतर ‘Appointment Date’ वर क्लिक करून उपलब्ध असलेली तारीख निवडा. (जर कोटा उपलब्ध नसेल, तर काही दिवसांनी पुन्हा प्रयत्न करा).
  • शेवटी ‘Appointment Print करा’ यावर क्लिक करा.

तुमची अपॉइंटमेंट निश्चित झाल्यावर एक पावती तयार होईल. या पावतीचा स्क्रीनशॉट घ्या किंवा तिची प्रिंट काढून घ्या. नेमून दिलेल्या तारखेला आणि पत्त्यावर ही पावती आणि तुमचे आधार कार्ड घेऊन जा व अत्यावश्यक वस्तूंचा संच मिळवा.

हे पण वाचा:
Ladaki Bahin yojna कुणाचे पैसे बंद होणार? लाडकी बहिण Kyc केल्यावर… Ladaki Bahin yojna

ही योजना बांधकाम कामगारांसाठी अत्यंत फायदेशीर असून, जास्तीत जास्त कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे पण वाचा:
Mahamandal karj yojana अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना माहिती… Mahamandal karj yojana

Leave a Comment