मित्रांनो, मराठा समाजातील तरुण आणि शेतकऱ्यांसाठी मोठा आधार असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे (Annasaheb Patil Aarthik Vikas Magas Mahamandal) पोर्टल गेल्या दीड महिन्यांपासून पूर्णपणे बंद आहे. या अचानक आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे समाजातील हजारो होतकरू बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत.
काय थांबले आहे?
पोर्टल बंद असल्याने अनेक अत्यावश्यक कामे ठप्प झाली आहेत:
- नवीन कर्जासाठी अर्ज: बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर/इतर गरजांसाठी नवीन कर्ज काढता येत नाहीये.
- व्याज परतावा (Interest Refund) प्रक्रिया: यापूर्वी कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांना कर्जाचे हप्ते भरल्यानंतर व्याज परताव्याचे स्टेटमेंट अपलोड करणे आणि परतावा मिळवणे थांबले आहे.
यामुळे अनेकांना दिवाळीच्या काळात व्यवसाय सुरू करण्याच्या किंवा तातडीच्या गरजा पूर्ण करण्याच्या संधीवर पाणी सोडावे लागले आहे.
पोर्टल बंद का आहे? राजकीय कटकारस्थानाचा थेट आरोप
Mahamandal karj yojana सुरुवातीला ‘पोर्टलचे अपडेटेशन चालू आहे’ अशी उत्तरे मिळत होती. मात्र, नुकत्याच नाशिक येथे झालेल्या बैठकीत महामंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील यांनी यामागचे खरे कारण उघड केले आहे.
- मुख्य कारण: नरेंद्र पाटील यांच्या म्हणण्यानुसार, हे महामंडळ अर्थ व नियोजन खात्यांतर्गत येते, ज्याचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार आहेत. याच खात्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी मॅनेजिंग डायरेक्टर (MD) देशमुख यांच्यावर दबाव आणून पोर्टल बंद पाडल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे.
- अन्यायाची शंका: कोणताही सरकारी पोर्टल जास्तीत जास्त २४ ते ४८ तासांपेक्षा अधिक काळ बंद राहू शकत नाही. तरीही दीड महिना पोर्टल बंद असणे हे संशयास्पद आहे. भुजबळ आणि MD देशमुख हे दोघेही मराठा समाजाचे नसल्याने, अजित दादा पवारांच्या अखत्यारीतील या खात्यातून मराठा समाजाला लक्ष्य केले जात असल्याची शंका नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.
- द्वेषाची भावना: मराठा समाजाला सध्या आरक्षण नसल्यामुळे, महामंडळाकडून मिळणारे कर्ज हा मोठा आधार आहे. हा आधार विशिष्ट लोकांना खपला नाही, मराठा समाजाबद्दलच्या द्वेषातूनच हे प्रकार घडत आहेत, असे थेट विधान पाटील यांनी केले आहे.
नरेंद्र पाटील यांचे मराठा समाजाला आवाहन
या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजाला एकत्र येण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे:
- निवेदन द्या: महाराष्ट्रातील ज्या मराठा बांधवांनी अर्ज केले आहेत किंवा ज्यांना अर्ज करायचे आहेत, त्या प्रत्येकाने त्वरित आपल्या तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्र येऊन निवेदन द्यावे.
- मागणी: महामंडळाचे पोर्टल लवकरात लवकर चालू करण्याची मागणी जोरदारपणे करावी.
- बदलीची मागणी: तसेच, मॅनेजिंग डायरेक्टर (MD) देशमुख यांची तात्काळ बदली करून, तिथे प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी करावी.
- मुख्यमंत्री लक्ष देतील: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजासाठी सकारात्मक असल्याने, हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आज मराठा समाजाने एकत्र येणे का गरजेचे?
मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा केलेला आरोप आणि आता अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पोर्टल बंद पाडण्याचा प्रकार… या घटनांमुळे मराठा समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याची भावना बळावत आहे.