स्वयंपाकघरातील धुरापासून महिलांची मुक्तता करण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY)’ ही एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात, म्हणजेच उज्ज्वला ३.० अंतर्गत, केंद्र सरकार आता अतिरिक्त ७५ लाख नवीन गॅस कनेक्शन देणार आहे.
Pm Ujjwala तुम्ही अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसेल, तर आता तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून ऑनलाईन अर्ज करू शकता. ही प्रक्रिया नेमकी कशी आहे, कोणती कागदपत्रे लागतील आणि पात्रता काय आहे, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
उज्ज्वला योजना ३.० ची मुख्य वैशिष्ट्ये
- मोफत कनेक्शन: लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर, रेग्युलेटर आणि पाईप मोफत दिले जातात.
- पहिले रिफिल मोफत: योजनेअंतर्गत पहिले गॅस रिफिल आणि शेगडी (Stove) मोफत मिळण्याची तरतूद आहे.
- थेट लाभ: ही योजना विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील महिलांसाठी आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया (Step-by-Step Guide)
Pm Ujjwala तुम्ही Indane, Bharatgas किंवा HP यापैकी कोणत्याही कंपनीचे कनेक्शन निवडू शकता. अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
१. अधिकृत पोर्टलला भेट द्या
सर्वात आधी उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जा. होम पेजवर तुम्हाला ‘Apply for New Ujjwala 3.0 Connection’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
२. गॅस कंपनीची निवड
तुमच्या भागात ज्या कंपनीची सर्व्हिस चांगली आहे (उदा. भारत गॅस, एचपी किंवा इंडियन), त्या कंपनीच्या समोरील ‘Click Here to Apply’ या लिंकवर क्लिक करा.
३. कनेक्शन प्रकार आणि पात्रता
आता ‘Type of Connection’ मध्ये ‘Ujjwala 3.0 New Connection’ निवडा. खाली दिलेल्या अटी व शर्ती वाचून चेकबॉक्सवर टिक करा.
४. वितरक (Distributor) शोधा
तुमचे राज्य (महाराष्ट्र) आणि जिल्ह्याचे नाव निवडा. त्यानंतर तुमच्या गावातील किंवा जवळच्या गॅस एजन्सीचे नाव निवडून ‘Continue’ करा.
५. मोबाईल व्हेरिफिकेशन
तुमचा चालू मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून OTP मिळवा. ओटीपी टाकून तुमचा नंबर व्हेरिफाय करा.
६. अर्जात वैयक्तिक माहिती भरा
- E-KYC: आधार कार्डाद्वारे ई-केवायसी पूर्ण करा.
- Family Details: रेशन कार्डचा नंबर टाकून घरातील १८ वर्षांवरील सर्व सदस्यांची नावे आणि आधार नंबर भरा.
- Address Details: तुमचा पत्ता, पिन कोड आणि पोस्ट ऑफिसची माहिती अचूक भरा.
- Bank Account: ज्या खात्यात गॅसची सबसिडी हवी आहे, त्या बँक खात्याचा आयएफएससी (IFSC) कोड आणि खाते क्रमांक टाका.
- Cylinder Type: तुम्हाला १४.२ किलोचा मोठा सिलेंडर हवा की ५ किलोचा छोटा, ते निवडा.
७. कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा
सर्व माहिती भरल्यावर रेशन कार्ड, आधार कार्ड आणि फोटो स्कॅन करून अपलोड करा. शेवटी ‘Submit’ बटणावर क्लिक करा. तुम्हाला एक Request ID मिळेल, तो जपून ठेवा.
आवश्यक कागदपत्रे (Documents Required)
अर्ज करताना खालील कागदपत्रे जवळ ठेवा:
१. आधार कार्ड (अर्जदार महिलेचे).
२. रेशन कार्ड (कुटुंबाचा पुरावा).
३. बँक पासबुक (सबसिडीसाठी).
४. मोबाईल नंबर (आधारशी लिंक असलेला).
५. प्रतिज्ञापत्र (Deprivation Declaration): कुटुंबाचे उत्पन्न मर्यादित असल्याचे जाहीर करणारे स्वयं-घोषणापत्र.
अर्जाची स्थिती (Status) कशी तपासायची?
अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाला की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही निवडलेल्या गॅस कंपनीच्या वेबसाईटवर जा. तिथे ‘Check Status’ पर्यायावर क्लिक करून तुमचा ‘Request ID’ आणि जन्मतारीख टाकून तुम्ही सद्यस्थिती पाहू शकता.