शासनाची नवी योजना, 95% अनुदान… Roof Top Solar

महाराष्ट्रातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना वीज बिलाच्या चिंतेतून मुक्त करण्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची योजना जाहीर झाली आहे. ती म्हणजे ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप (स्मार्ट) सोलर योजना’. केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजने’च्या धर्तीवर, ही ‘स्मार्ट’ योजना राज्यात २७ फेब्रुवारी २०२५ रोजी लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेद्वारे, राज्यातील लाखो कुटुंबांना त्यांच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी चक्क ९५% पर्यंत अनुदान मिळणार आहे.

Roof Top Solar या योजनेचं मुख्य उद्दिष्ट, राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि मध्यमवर्गीय वीज ग्राहकांना विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर (स्वयंपूर्ण) बनवणे आहे. त्यामुळे, मासिक वीज बिल कमी होईल, छतावरील सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढेल आणि पर्यावरणाचेही संरक्षण होईल.

‘स्मार्ट’ योजनेचा लाभ कोणास मिळणार?

Roof Top Solar या योजनेचा थेट आणि मोठा फायदा महाराष्ट्रातील ५ लाख घरगुती वीज ग्राहकांना होणार आहे. या लाभार्थ्यांची विभागणी खालीलप्रमाणे केली आहे:

हे पण वाचा:
loan scheme information अण्णासाहेब पाटील महामंडळ वेबसाईट बंद… loan scheme information

१. दारिद्र्यरेषेखालील (BPL) ग्राहक: सुमारे १,५४,६२२ ग्राहक.

२. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ ग्राहक: ज्यांचा मासिक वीज वापर १०० युनिटपेक्षा कमी आहे, असे सुमारे ३,४५,३७८ ग्राहक. यात सर्वसाधारण गट, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) या सर्व प्रवर्गातील ग्राहकांचा समावेश आहे.

विशेष लक्ष द्या: योजनेत दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना प्राधान्य दिले जाईल. इतर गटांसाठी ही योजना “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर राबवली जाईल.


हे पण वाचा:
Ladaki Bahin yojna कुणाचे पैसे बंद होणार? लाडकी बहिण Kyc केल्यावर… Ladaki Bahin yojna

अनुदानाची आकर्षक रचना

‘स्मार्ट’ योजनेत राज्य सरकार अतिरिक्त अनुदान देत असल्यामुळे, ग्राहकांना केवळ नाममात्र रक्कम भरावी लागणार आहे. एका १ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रणालीसाठी (अंदाजित खर्च रु. ५०,०००) मिळणारे अनुदान खालीलप्रमाणे आहे:

घरगुती वीज ग्राहकांचा गटग्राहकाचा भरावा लागणारा हिस्सा (रु.)एकूण अनुदान (रु.)अनुदानाची टक्केवारी
दारिद्र्यरेषेखालील२,५००/-४७,५००/-९५%
आर्थिक दुर्बळ (SC/ST)५,०००/-४५,०००/-९०%
आर्थिक दुर्बळ (सर्वसाधारण)१०,०००/-४०,०००/-८०%

योजनेत पात्र होण्यासाठी महत्त्वाच्या अटी

Roof Top Solar तुम्ही ‘स्मार्ट’ योजनेसाठी अर्ज करू इच्छित असाल, तर खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • ग्राहकांकडे वैध वीज कनेक्शन असणे गरजेचे आहे.
  • छतावरील सौर ऊर्जा प्रणालीसाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
  • इच्छुक ग्राहकाने राष्ट्रीय पोर्टलवर (PM Surya Ghar portal) नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • वीज ग्राहकावर कोणतीही थकबाकी नसावी.
  • वीज वापर: ऑक्टोबर-२०२४ ते सप्टेंबर-२०२५ या कालावधीतील कोणत्याही महिन्यात वीज वापर १०० युनिटपेक्षा जास्त नसावा.
  • फक्त सिंगल फेज वीज ग्राहकच पात्र असतील.

अंमलबजावणी आणि कालावधी

  • कालावधी: ही योजना मार्च २०२७ पर्यंत राबवली जाईल.
  • अंमलबजावणी: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) मार्फत योजनेची अंमलबजावणी केली जाईल. अर्ज छाननी, तांत्रिक तपासणी, परवानगी आणि प्रणाली बसवण्याचे सर्व काम महावितरणद्वारे केले जाईल.
  • देखभाल: स्थापित केलेल्या प्रणालीची ५ वर्षांपर्यंतची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पुरवठादाराची असेल.
  • निधी: योजनेसाठी २०२५-२६ आणि २०२६-२७ या आर्थिक वर्षांसाठी राज्य शासनाने एकूण ६५५ कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केली आहे.

हे पण वाचा:
Mahamandal karj yojana अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना माहिती… Mahamandal karj yojana

Leave a Comment