महाराष्ट्र राज्य कर्जमाफी अपडेट: राज्यातील बळीराजासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली शेतकरी कर्जमाफी (Farmer Loan Waiver) आता प्रत्यक्षात येताना दिसत आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार बँका आणि सहकारी सोसायट्यांनी पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
जर तुम्ही कर्जदार शेतकरी असाल, तर ही सुवर्णसंधी हातची जाऊ नये म्हणून तुम्हाला काही महत्त्वाची तयारी करावी लागणार आहे. कर्जमाफीचा लाभ नेमका कोणाला मिळणार आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
कर्जमाफीसाठी पात्र कोण असणार?
Shetkari Karjmafi सध्या शासन स्तरावर कर्जमाफीच्या अटी आणि शर्तींबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी असले तरी, प्राथमिक माहितीनुसार खालील निकष लावले जाऊ शकतात:
- २०२५ पर्यंतचे कर्जदार: ज्या शेतकऱ्यांनी २०२५ मध्ये कर्ज घेतले आहे किंवा ज्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे, त्यांचा विचार होण्याची शक्यता आहे.
- अतिवृष्टी बाधित: नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य मिळण्याची मागणी होत आहे.
- समितीचा अहवाल: मुख्यमंत्री स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे, त्यानंतर अंतिम घोषणा होईल.
बँका आणि सोसायट्यांकडून डेटा संकलन सुरू
Shetkari Karjmafi राज्य सरकारने विविध सहकारी बँकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील कर्जदार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये:
- शेतकऱ्याचे नाव आणि कर्ज खाते क्रमांक.
- घेतलेली मूळ कर्जाची रक्कम.
- आजवर भरलेली रक्कम आणि शिल्लक थकबाकी.ही सर्व तांत्रिक माहिती गोळा केली जात आहे जेणेकरून थेट लाभ हस्तांतरण (DBT) करणे सोपे जाईल.
तात्काळ आवश्यक असणारी ६ महत्त्वाची कागदपत्रे
Shetkari Karjmafi कर्जमाफीच्या यादीत तुमचे नाव यावे यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करून ती तुमच्या संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये जमा करा:
- ८-अ उतारा (8-A Extract): तुमच्या जमिनीची अद्ययावत माहिती असलेला उतारा.
- आधार कार्ड (Aadhaar Card): ओळख पटवण्यासाठी आधार कार्डाची झेरॉक्स प्रत.
- पॅन कार्ड (PAN Card): आर्थिक व्यवहारांच्या नोंदीसाठी.
- फार्मर आयडी (Farmer ID): शेतकरी प्रमाणपत्र किंवा आयडी.
- बँक पासबुक (Bank Passbook): ज्या खात्यावर व्यवहार होतात, त्या सेव्हिंग खात्याच्या पहिल्या पानाची प्रत.
- आधार लिंक मोबाईल नंबर: सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आधारशी लिंक असलेला सक्रिय मोबाईल क्रमांक.
जर मूळ कर्जदार सभासदाचा मृत्यू झाला असेल, तर त्यांच्या वारसांनी ‘मृत्यू दाखला’ आणि ‘वारस प्रमाणपत्र’ ही कागदपत्रे वरील कागदपत्रांसोबत जमा करणे अनिवार्य आहे.
शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे का गरजेचे आहे?
२०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफी दरम्यान अनेक शेतकरी केवळ तांत्रिक चुकांमुळे किंवा अपुऱ्या कागदपत्रांमुळे लाभापासून वंचित राहिले होते. विशेषतः सामायिक जमिनींचे प्रकरण किंवा आधार लिंक नसलेल्या खात्यांमुळे अडचणी आल्या होत्या. यावेळेस अशी चूक टाळण्यासाठी:
- तुमचा आधार क्रमांक बँकेशी लिंक असल्याची खात्री करा.
- सोसायटीने मागितलेली माहिती वेळेत आणि अचूक सादर करा.
- केवळ सहकारी बँकाच नाही, तर राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्जदार असाल तरीही कागदपत्रे तयार ठेवा.