केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२५ साठी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. या हंगामात सोयाबीन, मूग आणि उडीद या तीन प्रमुख पिकांची हमीभावाने (MSP) खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. या निर्णयानुसार, एकट्या महाराष्ट्रातून सुमारे १८.५ लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नोंदणी प्रक्रिया सुरू झाली!
nafed online registration हमीभावाने शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली आहे. आपल्या शेतमालाची योग्य किंमत मिळावी यासाठी प्रत्येक पात्र शेतकऱ्याने नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणी करण्याचे दोन सोपे मार्ग:
nafed online registration तुम्ही खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने नोंदणी करू शकता:
१. जवळचे खरेदी केंद्र: आपल्या नजीकच्या हमीभाव खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करणे.
२. ऑनलाइन पद्धत: ई-समृद्धी (e-Samridhi) पोर्टल किंवा ई-समृद्धी ॲप्लिकेशन (Application) वापरून घरबसल्या ऑनलाइन नोंदणी करणे.
ई-समृद्धी ॲपद्वारे ऑनलाइन नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया (Step-by-Step Guide):
यावर्षी नोंदणी प्रक्रियेत फेस व्हेरिफिकेशन (चेहरा प्रमाणीकरण) किंवा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन (अंगठा प्रमाणीकरण) यासारख्या पडताळणी पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे केवळ खऱ्या शेतकऱ्यांचाच शेतमाल हमीभावाने विकला जाईल याची खात्री होईल.
आवश्यक ॲप्लिकेशन्स (Apps):
ऑनलाइन नोंदणीसाठी तुमच्या मोबाईलमध्ये खालील दोन ॲप्स असणे अनिवार्य आहे:
- e-Samridhi (ई-समृद्धी)
- Face Aadhaar RD (फेस आधार आरडी)
नोंदणीसाठी सोप्या पायऱ्या:
१. ॲप डाउनलोड आणि भाषेची निवड:
- Google Play Store वरून ‘e-Samridhi’ ॲप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करा.
- ॲप उघडल्यावर, प्रथम ‘मराठी’ भाषा निवडून ‘सेव्ह’ करा.
२. लॉगिन/नोंदणी:
- तुमचा मोबाइल नंबर आणि दिलेला कॅप्चा कोड भरा.
- ‘सबमिट’ वर क्लिक करून OTP किंवा पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- लॉगिन झाल्यावर, ‘नोंदणी’ (Registration) पर्याय निवडा. (यामध्ये तुम्हाला तात्पुरती नाही, तर बँक आणि नॉमिनी तपशीलासह पूर्ण नोंदणी करायची आहे).
३. आधार पडताळणी (Aadhaar Verification):
- येथे तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
- पडताळणीसाठी ‘चेहरा प्रमाणीकरण’ किंवा ‘फिंगरप्रिंट प्रमाणीकरण’ यापैकी एक पर्याय निवडा.
- चेहरा प्रमाणीकरण निवडल्यास, Face Aadhaar RD ॲपच्या मदतीने तुमचा चेहरा स्कॅन करून पडताळणी पूर्ण करा.
- पडताळणी यशस्वी होताच, तुमची आधार माहिती आपोआप भरली जाईल.
४. वैयक्तिक व शेत जमिनीची माहिती भरा:
- तुमचे नाव आणि आधार क्रमांक आपोआप दिसेल.
- तुमच्या शेत जमिनीचा तपशील काळजीपूर्वक भरा:
- राज्य: महाराष्ट्र
- जिल्हा, तालुका, गाव निवडा.
- तुमचा गट नंबर/सर्वे नंबर आणि संबंधित एकूण क्षेत्र (हेक्टर/एकर) भरा.
- जमिनीचा प्रकार (उदा. मालकीची – Owned) निवडा.
५. योजनेत सहभाग आणि पीक निवड:
- ‘योजनेत सहभाग’ (Scheme Participation) यावर क्लिक करा.
- ‘सोयाबीन’ (उदा. PSS SOYABEAN PROCUREMENT KHARIF 2025), ‘मूग’ किंवा ‘उडीद’ यापैकी नोंदणी करायचे पीक निवडा.
- तुम्ही निवडलेल्या पिकासाठी किती क्षेत्राची (हेक्टरमध्ये) नोंदणी करत आहात, ते नमूद करा (उदा. १ हेक्टर).
६. ७/१२ उतारा अपलोड करा:
- तुमचा डिजिटल ७/१२ उतारा किंवा तलाठ्याच्या सही-शिक्क्याने प्रमाणित केलेला ७/१२ उतारा अपलोड करा.
- कागदपत्र अपलोड झाल्यावर ‘सबमिट’ वर क्लिक करा.
७. नोंदणी पूर्ण करा व पावती मिळवा:
- “तुम्हाला अपलोड केलेली माहिती सेव्ह करायची आहे का?” या प्रश्नावर ‘होय’ क्लिक करा.
- तुमची नोंदणी पूर्ण होईल आणि तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल.
- या क्रमांकाची नोंदणी पावती (Registration Receipt) डाउनलोड करा आणि तिची प्रिंट काढून घ्या.
बँक आणि नॉमिनी तपशील अपडेट करणे:
जर तुम्ही अद्याप बँक तपशील आणि नॉमिनी (Nominee) ची माहिती ॲपमध्ये जोडली नसेल, तर ती लॉगिन करून त्वरित अपडेट करा.
- बँक तपशिलात तुमचा IFSC कोड, बँक खाते क्रमांक आणि पासबुकची प्रत अपलोड करावी लागेल.
प्रत्यक्ष खरेदीसाठी आवश्यक कागदपत्रे:
शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर जाताना, खालील कागदपत्रे सोबत ठेवा:
- नोंदणीची प्रिंटआउट (पावती)
- डिजिटल ७/१२ किंवा तलाठ्याने प्रमाणित केलेला ७/१२ उतारा
- आधार कार्ड
- बँकेच्या पासबुकची प्रत