‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) संदर्भात एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे! अनेक महिन्यांपासून ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता, त्यांचे बँक खाते आता पुन्हा एकदा ₹१५०० च्या हप्त्याने भरण्यास सुरुवात झाली आहे.
२६ लाख महिलांना मोठा दिलासा
ladki Bahin Yojana मागील काही काळात, जवळपास २६ लाख महिलांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आले होते आणि जून महिन्यापासून त्यांचे हप्ते थांबवले गेले होते. परंतु, आता एक महत्त्वाचा बदल झाला असून, या सर्व महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता (जो ऑक्टोबरमध्ये जमा झाला आहे) वर्ग करण्यात आला आहे. मागील थांबलेले हप्ते जरी आले नसले तरी, सप्टेंबरचा हप्ता मिळाल्याने तुमचा पुढील लाभ सुरू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
पुढील लाभ अखंडित हवा? तर हे काम त्वरित करा!
ladki Bahin Yojana तुम्हाला भविष्यात दरमहा मिळणारा ₹१५०० चा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय हवा असेल, तर तुम्ही एक अत्यंत महत्त्वाचे काम तातडीने पूर्ण करणे अनिवार्य आहे: ते म्हणजे तुमचे e-KYC (ई-केवायसी)!
ही आहे धोक्याची घंटा!
सध्याच्या माहितीनुसार, पुढील दोन महिने (ऑक्टोबर आणि नोव्हेंबरपर्यंत) तुम्हाला हप्ते मिळत राहतील. परंतु, यानंतर सरकार अत्यंत कठोर निर्णय घेणार आहे. ज्या महिलांनी त्यांचे e-KYC पूर्ण केलेले नसेल, त्यांना डिसेंबर महिन्यापासून योजनेचे पैसे मिळणार नाहीत! हा नियम सर्व लाभार्थ्यांसाठी अनिवार्य करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावर स्पष्ट सूचना दिली आहे, “ई-केवायसी नाही, तर पैसेही नाही!” त्यामुळे, लाभ थांबण्यापूर्वी त्वरित e-KYC पूर्ण करा.
e-KYC (ई-केवायसी) कसे पूर्ण करावे?
ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि तुम्ही घरबसल्या पूर्ण करू शकता.
- YouTube वर जा.
- सर्च बारमध्ये “Marathi Corner e-KYC” असे टाईप करून सर्च करा.
- तो व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून, दिलेल्या सूचनांचे पालन करून तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण करा.टीप: तुम्ही Ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन देखील e-KYC करू शकता.
सर्वात महत्त्वाचे आवाहन:
ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तुमच्या ओळखीतील, कुटुंबातील, मित्र-मैत्रिणींमधील ज्या महिला ‘लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी आहेत, त्या प्रत्येकीपर्यंत हा लेख त्वरित पोहोचवा. कोणाचाही लाभ केवळ KYC न केल्यामुळे थांबू नये, यासाठी त्यांना मदत करा!